मासिक पाळीतही कोविड लस सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:27+5:302021-05-06T04:41:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचून घेणं अत्यंत सुरक्षित आहे. त्या संदर्भात सध्या समाजमाध्यमातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचून घेणं अत्यंत सुरक्षित आहे. त्या संदर्भात सध्या समाजमाध्यमातून ‘व्हायरल’ होत असलेली माहिती अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारी असून त्यावर कोणीही विश्वास ठेवून लस न घेणे िकंवा टाळणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नये, अशी माहिती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. मात्र ही पोस्ट चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे, असा स्पष्ट निर्वाळा स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ देतात.
गाईडलाईन काय सांगते...
१. देशात ज्या लोकांना लसीची आवश्यकता आहे, अशांना ती प्रथम दिली जाण्याची शिफारस करण्यात आली आहे.
२. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
३. वयाच्या हिशेबाने लस दिली जाणार आहे. यात ५०च्या वरील आणि खालील असे गट केले आहेत.
४. आधीपासूनच कोणते आजार असतील अशा लोकांना प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे.
कोट :
मासिक पाळीत प्रतिकारशक्ती कमी होते याचा काहीही संबंध नाही. मासिक पाळी सुरू असताना किंवा त्याआधी आणि नंतरही लस घेणं हे पूर्ण सुरक्षित आहे. त्याचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही.
- डॉ. अंजली मणेरीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ
गर्भवती महिलांनी लस घ्यावी. लस घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र महिलांनी हा निर्णय स्वत:च्या स्वत: न घेता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार ते ठरवावं.
- डॉ. पल्लवी पिसाळ, स्त्रीरोगतज्ज्ञ
मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे खरं आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे चूक आहे. लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा महिलांनी ती घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही.
- डॉ. पौर्णिमा फडतरे, स्त्रीरोगतज्ज्ञ
आकडेवारी
एकूण लसीकरण ५२६१२१
फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस ३८८०३९
फ्रंटलाईन वर्कर दुसरा डोस १९०१६
.....................................
६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक
पहिला डोस २३६५९२
दुसरा डोस २८४११
..............................
४५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक
पहिला डोस २२०५९२
दुसरा डोस १४३६८
..........................
\\\\\\\\\