कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:50 PM2019-08-03T14:50:11+5:302019-08-03T14:52:03+5:30

कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला.

Coyne's doors opened two feet | कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले, नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा नदीपात्रात १३,५२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग

सातारा : कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला.

कोयना पायथा वीजगृहातून सुरू असलेला २१०० क्युसेक विसर्ग धरून कोयना धरणातून एकूण १३,५२७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. विसर्ग, पाण्याची आवक व पावसाची तीव्रता पाहून कमी किंवा जास्त करण्यात येईल. विसर्गात होणारा बदल अवगत करण्यात येईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली आहे.

धरणाच्या खालील भागातील नदीकाठची शहरे, गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. नागरिकांनी सतर्क राहावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. विजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवित वा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Coyne's doors opened two feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.