दप्तरात कोयता, रिव्हॉल्व्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:25 AM2019-11-21T00:25:37+5:302019-11-21T00:25:41+5:30

कºहाड : शाळकरी मुलांच्या दप्तरात धारदार कोयता, फायटर, चाकू आणि बनावट पिस्तूल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Coyote, revolver at the office | दप्तरात कोयता, रिव्हॉल्व्हर

दप्तरात कोयता, रिव्हॉल्व्हर

Next

कºहाड : शाळकरी मुलांच्या दप्तरात धारदार कोयता, फायटर, चाकू आणि बनावट पिस्तूल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने प्रसंगावधान राखत या मुलांना ताब्यात घेतल्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. एकाला धडा शिकवण्यासाठी ही मुले संबंधित हत्यारे घेऊन आल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.
कºहाड परिसरातील एका खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या चार मुलांची एका मुलाशी वादावादी होत होती. हा वाद वाढत गेल्यावर चार मुलांनी त्या मुलास धमकावण्यासाठी कोयता, फायटर आणि बनावट रिव्हॉल्व्हर गोळा केले. ते दप्तरात लपवून क्लासमध्ये आले होते. ज्या मुलाशी भांडणे झाली आहे, त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी ती हत्यारे जवळ ठेवली होती.
दरम्यान, हा प्रकार पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना समजला. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, पोलीस कर्मचारी सौरभ कांबळे, प्रवीण पवार, सागर बर्गे यांना सूचना देऊन खात्री करण्यास सांगितले. पोलिसांनी त्या मुलांवर गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली. तसेच ते काही करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच ती मुले घाबरली. त्यांच्याकडून पोलिसांनी दप्तर ताब्यात घेऊन तपासले असता त्यामध्ये कोयता, फायटर व बनावट रिव्हॉल्व्हर मिळून आले. त्या मुलांसह त्यांची ज्या मुलाशी भांडणे झाली होती, त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलांच्या पालकांनाही तत्काळ बोलवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी मुलांना समज दिली. तसेच त्यांच्या पालकांची चांगलीच झाडाझडती घेतली.

Web Title: Coyote, revolver at the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.