खटावला खोल खोल पाणी, विहिरींनी गाठला तळ : सूर्यनारायण लागले आग ओकायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:17 PM2019-03-28T14:17:56+5:302019-03-28T14:19:01+5:30

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे अजुन उर्वरीत असलेले उन्हाळ्याचे दोन महिने कसे जातील याची चिंता सतावू लागली आहे.

Cracked deep deep water, the bottom reached by wells: Suryanarayana started burning fire | खटावला खोल खोल पाणी, विहिरींनी गाठला तळ : सूर्यनारायण लागले आग ओकायला

खटावला खोल खोल पाणी, विहिरींनी गाठला तळ : सूर्यनारायण लागले आग ओकायला

Next
ठळक मुद्देखटावला खोल खोल पाणी, विहिरींनी गाठला तळ सूर्यनारायण लागले आग ओकायला

खटाव : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे अजुन उर्वरीत असलेले उन्हाळ्याचे दोन महिने कसे जातील याची चिंता सतावू लागली आहे.

खटाव परिसर मुळातच कमी पावसाचा आहे. त्यातच उन्हाळ्याचा भडका वाढत आहे. शेती पाण्याचा प्रश्न तर गंभीरच बनला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सर्वांना तिव्रतेने भेडसावू लागला आहे. पाण्याची दिवसेदिवस खालावत चाललेली पातळी पाहता उन्हाळ्याचे महिने संपेपर्यंत सध्याची पाण्याची परिस्थिती पाहीली तर कसे होणार याची चिंता भेडसवू लागली आहे.

सध्या बऱ्याच शेतातील विहीरींनी तळ गाठला आहे. काही विहीरी पाण्यावाचून कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. गावातील बरेच सार्वजनीक हातपंप पंप बंद पडले आहेत.

पाण्याची तीव्र टचाई तसेच पाण्याचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईची ही अवस्था असेल तर बाकीचे पुढील दिवस कसे जाणार याची चिंता आता शेतकºयासह सर्वसामान्य लोकांनाही लागली आहे.

Web Title: Cracked deep deep water, the bottom reached by wells: Suryanarayana started burning fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.