Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली

By प्रमोद सुकरे | Published: July 24, 2024 03:51 PM2024-07-24T15:51:19+5:302024-07-24T15:52:41+5:30

कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ...

Crane Pokeland was vandalized by unknown assailants after the cable wire of an old jackwell that supplied water to Karad town broke in karad | Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली

Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली

कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटली. त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या  पाण्याचा प्रश्न निर्माण होणार अशी समाजमाध्यमात चर्चा सुरू झाली.

त्याचे पडसाद बुधवारी सकाळी उमटले. कराड  मधील अज्ञात १५ ते २० तरुणांनी ठेकेदाराची क्रेन  व  २ पोकलँडच्या काचांची  तोडफोड केली.तसेच टायर वरती डिझेल टाकून क्रेन पेटवून देण्याचाही प्रयत्न केला .पण पावसाच्या सरी कोसळत असल्याने क्रेन पेट घेऊ शकली नाही.पण यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याचे घटनास्थळावरुन समजते.

दरम्यान घटनेची माहिती समजतात कराड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील व त्यांची टिम तेथे दाखल झाली आहे. त्यामुळे कराडचा पाणीप्रश्न ऐन पावसाळ्यात तापला आहे.

Web Title: Crane Pokeland was vandalized by unknown assailants after the cable wire of an old jackwell that supplied water to Karad town broke in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.