आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:02+5:302021-06-02T04:29:02+5:30

सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सातारा शहर आणि परिसरात विनाकारण, विनामास्क, विनापरवाना फिरणाऱ्यांवर सातारा शहर आणि ...

Crime against 11 persons violating the order | आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा

Next

सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सातारा शहर आणि परिसरात विनाकारण, विनामास्क, विनापरवाना फिरणाऱ्यांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांकडून ११ जणावर गुन्हे दाखल करण्यात आले.

कमानी हौद, रविवार पेठ, पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात या कारवाया झाल्या असून काहींच्या दुचाकीही जप्त करण्यात येत आहेत.

रविवार पेठ हद्दीत असणाऱ्या आर. के. बॅटरी येथे सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या गौरव मधुकर कदम (रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस हवालदार पी. एम. भिसे हे करत आहेत.

साताऱ्यातील पंताचा गोट परिसरात विनाकारण फिरणाऱ्या सूरज बाजीराव जाधव, महेंद्र दिनकर जाधव, गोपी नंदकुमार धनवडे, प्रथमेश हरिविजय बाबर (सर्व रा. पंताचा गोट, सातारा) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश भोंग यांनी याबाबतची तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.

कमानी हौद परिसरात विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्या सचिन प्रल्हाद सुपेकर (वय ४२, रा. गुरुवार पेठ, सातारा), नीलेश अशोक चक्के (वय ३५, गुरुवार पेठ, सातारा), संतोष शिवाजी झनकर (वय ३७, रा. गुरुवार पेठ, सातारा), किशोर कुंडलिक पालसोडे (वय ४३, रा. मंगळवार पेठ, सातारा) या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार सत्यवान बसवंत यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक घाडगे हे करत आहेत.

सातारा शहरालगत असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात विनाकारण दुचाकी चालवणाऱ्या दिलीप किसन निकम (वय ५९, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अमृत वाघ यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.

सातारा येथील रविवार पेठेतील लकी जनरल स्टोअर्स दुकान चालू ठेवल्याप्रकरणी तौफिक रशीद पटेल (वय ३३, रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक घाडगे करत आहेत.

Web Title: Crime against 11 persons violating the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.