साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:43+5:302021-05-18T04:40:43+5:30
सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. असे असतानाही त्याचे अनेक ठिकाणी उल्लंघन केले ...
सातारा : कोरोना महामारीत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. असे असतानाही त्याचे अनेक ठिकाणी उल्लंघन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. साताऱ्यातील कमानी हौद, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवई नाका, मोती चौक आदी परिसरात विनाकारण, विनापरवाना, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी १३ जणांवर कारवाई केली आहे.
कमानी हौद परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्या ४ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोहार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. रामचंद्र दादू माने (वय ४१, रा. सहयोग निवास, गोडोली, सातारा), अक्षय अभयराज हसुले (वय २५, रा. २६३, आनंदवन अपार्टमेंट, व्यंकटपुरा पेठ, सातारा), विश्वास भगवान नारकर (वय ४६, रा. ४१0 सोमवार पेठ, सातारा), जहांगिर अजीज मुल्ला (वय ४५, रा. ३३, मल्हारपेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
जमीर अस्लम शेख (वय ३९, ६६६, मंगळवार पेठ, सातारा), चिंतामणी मोहन महाबळेश्वरकर (वय २८, रा. ३५३ मंगळवार पेठ, सातारा), आकाश यशवंत तोडादार (वय २०, रा. गुरुवार बागेजवळ, केसरकर पेठ, सातारा) हे कमानी हौद परिसरात विनाकारण फिरत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार अरुण दगडे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
सातारा येथील एमआयडीसी परिसरात असणारे हॉटेल मीन बार उघडे ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महेंद्र नागेश नाईक (वय ५७, रा. साई कॉलनी, शाहूनगर, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण आणि विनापरवाना फिरणाऱ्या अभिषेक जितेंद्र शिवदास (रा. सत्यमनगर, सातारा), जगराम मिर्जाराम वर्मा (रा. दौलतनगर, सातारा), दिनेश नामदेव माने (रा. आदित्यनगरी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक उदयसिंह नारायण जाधव यांनी याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत. दरम्यान, आतिष गौतम राजगुरु (रा. दौलतनगर, सातारा), ज्योती महेंद्र पवार (रा. गुलमोहोर मंगल कार्यालय, सातारा) हे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण आणि विनापरवाना फिरत असल्यामुळे त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.