CoroanVirus Satara : साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:12 PM2021-05-06T13:12:06+5:302021-05-06T13:14:27+5:30

CoroanVirus Satara : कोरोना महामारीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही सातारा शहर, तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक फुलविक्रेतेचाही समावेश आहे.

Crime against 15 people wandering in Satara without any reason | CoroanVirus Satara : साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हा

CoroanVirus Satara : साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हाफुलविक्रेत्यावरही कारवाई

सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही सातारा शहर, तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक फुलविक्रेतेचाही समावेश आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, पोवई नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकील अमीर काझी (वय ३४, रा. पीरवाडी, सातारा), अभय सुका महाली (वय ५३, रा. भोसले कॉलनी, कोडोली, सातारा), तनुश्री, चैतन्य भिसे (वय २७, रा. वाढेफाटा, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील कर्णे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे करत आहेत.

सातारा शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विकास शिंदे यांनीही एक तक्रार दिली असून, त्यांच्या तक्रारीनंतर सुयोग राजकुमार वनारसे (वय ४८, रा. निशिगंधा हाउसिंग सोसायटी, एमआयडीसी, सातारा), प्रशांत प्रभाकर सोनमळे (वय ३७, रा. पीरवाडी, सातारा), राजू गुरप्पा चव्हाण (वय २७, संजीवनी सोसायटी, शाहूनगर, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे करत आहेत.

सातारा शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संभाजी जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अल्ताफ जमाल शेख (वय ५५), अत्तार अल्ताफ शेख (वय २०, दोघे रा. रविवार पेठ, सातारा), सनिराज नामदेव जाधव (वय २५, रा. क्षेत्रमाहुली, सातारा), महम्मद कलाम अमीर शेख (वय ६८, रा. ब्लू प्लाझा अपार्टमेंट, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे करत आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल किशोर तारळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोहित मगनलाल जैन, वक्ताराम आसाराम देसाई (वय ३०, रा. मोळाचा ओढा, आयटीआय, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे करत आहेत.

दीपक कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ओमकार बापूसाहेब कणसे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा), विठ्ठल ज्ञानदेव देवगिरी (वय ६६, रा. शिवकृपा अपार्टमेंट, उत्तेकरनगर, सदरबझार, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे हे करत आहेत.

फुलविक्रेत्यावरही कारवाई

कोरोना महामारीत सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतरही अजूनही काही जणांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. पोवई नाक्यावर एका फुलविक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले की, पोवई नाक्यावर मराठा खानावळीच्या शेजारी असलेले नीलकमल फ्लॉवर हे दुकान सुरू ठेवून त्याच्या मालकीची चारचाकी (एमएच- १५ ईपी- ३५७५) फुलांनी सजवत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्यासह भीमराव नामदेव वाघांबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे हे करत आहेत. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संजय सपकाळ यांनी दिली आहे.

Web Title: Crime against 15 people wandering in Satara without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.