वेण्णा नदीतील वाळूचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:17+5:302021-02-20T05:51:17+5:30
सातारा : तालुक्यातील नेले गावच्या हद्दीत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रातून वेळोवेळी विनापरवाना ३४४ ब्रास वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका ...
सातारा : तालुक्यातील नेले गावच्या हद्दीत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रातून वेळोवेळी विनापरवाना ३४४ ब्रास वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या वाळूची किमंत २० लाख १८ हजार ९३६ रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, विशाल कांतीलाल शेडगे (रा. अंगापूर, ता. सातारा) याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या वाहनावरील चालक या दोघांनी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेसातपूर्वी तसेच वेळोवेळी कोणतीही शासकीय परवानगी न घेता नदीपात्रातून वाळू चोरून नेली. या प्रकरणी प्रभाकर मोहिनीराज कुलकर्णी (४२, रा. योजनानगर गृहनिर्माण संस्था, सदर बझार, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विशाल व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी हे करीत आहेत.