साताऱ्यात चार हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:57+5:302021-07-30T04:40:57+5:30
सातारा : दुकानदारांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले असतानाही अनेक दुकानदार हे निर्बंध झुगारत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी ...
सातारा : दुकानदारांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले असतानाही अनेक दुकानदार हे निर्बंध झुगारत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी शहरातील चार हॉटेल व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
अतुल अशोक केंजळे (वय २७, रा. शिवराज पेट्रोल पंप परिसर, सातारा), सुनील पांडुरंग जाधव (रा. वाढे, ता. सातारा), नियास चंद्रघंटी (वय ४८, रा. म्हसवे, ता. सातारा), रफिक अब्दुल्ला छेनोते (वय ४२, रा. म्हसवे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल केंजळे यांनी त्यांचे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. सुनील जाधव यांनी वाडे फाटा गावच्या हद्दीतील हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. चंद्रघंटी यांनी त्यांचे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. रफिक छेनोते यांनीही त्यांचे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. या व्यावसायिकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.