बेकायदा दस्त केल्याने साताऱ्यातील एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:15+5:302021-08-19T04:43:15+5:30
सातारा : मयत व्यक्तीचे मुखत्यार म्हणून खोट्या व बेकायदा सह्या करून दस्त केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात ...
सातारा : मयत व्यक्तीचे मुखत्यार म्हणून खोट्या व बेकायदा सह्या करून दस्त केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी रामचंद्र दगडू जाधव (वय ४९, रा. चिखली, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नीलेश वल्लभदास धनानी (वय ४२, रा. सदरबझार, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादीचे वडील दगडू देवजी जाधव मयत झाले होते. वारस म्हणून फिर्यादी व इतरांच्या नोंदी फेब्रुवारी १९९९ मध्ये झाल्या होत्या. त्यानंतर तथाकथित दस्ताच्या वेळी २९ डिसेंबर १९९९ ला दगडू जाधव हे मयत होते. मयत व्यक्तीच्या नावाने मुखत्यार म्हणून सहीचा अधिकार कोणासही नाही. असे असतानाही संशयिताने दगडू जाधव यांच्या वतीने खरेदी पत्रावर सह्या केल्या आहेत. खोट्या व बेकायदेशीररीत्या सह्या करून दस्त अस्तित्वात आणला. सातारा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात याची नोंद झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बधे हे तपास करीत आहेत.
.......................................................