घटस्फोटासाठी धमकावल्याने महिला पोलिसासह एका पोलिसावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 PM2021-04-14T16:07:19+5:302021-04-14T16:08:27+5:30
Police Satara : घटस्फोट द्यावा म्हणून एकाला दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसह अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा चौधरी आणि जगदीश कोकणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस मुख्यालयात सेवेत आहेत. दरम्यान, महिला पोलिसासह अन्य एका पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सातारा : घटस्फोट द्यावा म्हणून एकाला दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसह अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा चौधरी आणि जगदीश कोकणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस मुख्यालयात सेवेत आहेत. दरम्यान, महिला पोलिसासह अन्य एका पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मनीषा आणि दीपक चौधरी (रा. गोळीबार मैदान, सातारा) हे पती-पत्नी असून मनीषा या पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहेत. मनीषा यांनी शनिवार, दि. १० एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता जगदीश कोकणी याला घरी बोलावून घेतले.
यावेळी मनीषा हिने दीपक यांना 'मला आत्ताच्या आता घटस्फोट पाहिजे आणि घटस्फोट नाही दिला तर आम्ही तुमच्या जिवाचे काहीतरी बरे वाईट करून आमच्याही जिवाचे बरेवाईट करून घेऊ,' अशी धमकी दिली. यानंतर दीपक यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. मात्र, दीपक हे ऐकत नसल्याचे पाहून या दोघांनीही त्यांना संगनमत करून मारहाण केली. दरम्यान, जगदीश कोकणी याने दीपक यांना वारंवार फोन करून मनीषा हिला घटस्फोट दे, असे म्हणून धमकीही दिली.