गुटखा विक्री करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:36 PM2021-04-29T16:36:18+5:302021-04-29T16:38:45+5:30
CoroanVirus Satara : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही विनाकारण रिक्षा फिरवून गुटखा विक्री करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला.
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही विनाकारण रिक्षा फिरवून गुटखा विक्री करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला.
जावेद पठाण असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, जावेद महमूद पठाण (वय ४२, रा. शनिवार पेठ, सातारा) हा रविवार, दि. २५ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास विनाकारण रिक्षा (क्र. एमएच ११ ए ९२०४) घेऊन बाहेर फिरण्याबरोबरच तो गुरुवार परज परिसरात गुटखा विक्री करताना पोलिसांना आढळून आला.
त्यामुळे त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेद याला याप्रकरणी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक राजेंद्र जाधव यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.