जिल्ह्यात तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:26+5:302021-06-18T04:27:26+5:30
सातारा: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन हॉटेल व्यावसायिक ...
सातारा: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन हॉटेल व्यावसायिक आणि विनाकारण वाहनातून फिरणाऱ्या ८ जणांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी, काशीळ, ता. सातारा येथे महामार्गाकडेला हॉटेल अजिंक्यचे मालक अमोल दिलीप कदम (वय २७, रा. काशीळ आणि रॉयल रेस्टो हॉटेलचे मालक समीर सलीम मुलाणी (वय २५, रा. काशीळ) यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत हॉटेल्स सुरू ठेवले. याप्रकरणी पोलीस हवालदार विजय साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुशी, ता. सातारा येथे राजयोग लॉजिंग हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अविनाश प्रकाश काळे (वय १९, रा. सरताळे, ता. जावली), सचिन रामचंद्र माळवदे (वय ४०, रा. नागेवाडी, ता. सातारा), योगेश बर्गे (रा. अजिंक्यनगर, ता. कोरेगाव) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बोगदा ते यवतेश्वर मार्गावर १६ रोजी रात्री १२ च्या सुमारास विनाकारण वाहनातून फिरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयस सूर्यकांत कदम (वय २२ रा. मंगळवार पेठ, सातारा, संभाजी रवींद्र पवार (वय ३५,रा. केसरकर कॉलनी), शिवांकुर विजय बगाडे (वय १८, रा. मोरे कॉलनी सातारा), योगेश राजेंद्र जाधव (वय २१, रा. मोरे कॉलनी सातारा), जोतिबा मोरू पाटील (वय ३४, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), संदीप तुकाराम पवार (वय ४६, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे १६ रोजी १२ च्या सुमारास आनंद विठ्ठल पोळ (वय ३९, रा. मल्हारपेठ सातारा) आणि जयवंत शिवदास कांबळे हे विनाकारण फिरताना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.