अवैद्य वाळू वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा, विधीसंघर्ष बालक ताब्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:11 PM2022-02-03T14:11:31+5:302022-02-03T14:13:52+5:30

एका विधीसंघर्ष बालकासह तीन व्यक्ती डंपरमध्ये वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले

Crime against three in illegal sand transport case in satara | अवैद्य वाळू वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा, विधीसंघर्ष बालक ताब्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैद्य वाळू वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा, विधीसंघर्ष बालक ताब्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

फलटण : तालुक्यातील निभोरे ते मिरगाव रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन दहा लाखांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विधीसंघर्ष बालकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत निभोरे ते मिरगांव जाणारे रोडने पांढरे–पिवळे रंगाच्या डंपरमधून काहीजण वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास मिळाली. त्यानुसार बुधवार, दि. २ रोजी रात्री दहाच्या सुमारास निभोरे ते मिरगाव जाणारे पालखी विसाव्याजवळील रस्त्यावर पथकाने सापळा रचून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकला. त्यात एक डंपर व कारचा वापर करुन एका विधीसंघर्ष बालकासह तीन व्यक्ती डंपरमध्ये वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले. 

तीन ब्रास वाळूने भरलेल्या डंपर व एका अल्टो कारसह सर्वाना ताब्यात घेतले. प्रशांत सतीश भिसे (वय १९) व महेश उर्फ अक्षय विलास गायकवाड (वय २६, दोघे रा. सुरवडी ता. फलटण) यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका विधीसंघर्ष बालकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन तीन ब्रास वाळूने भरलेला डंपर व कार असा एकूण १० लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिले. सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा किशोर धुमाळ यांचे आदेशानुसार सहायक फौजदार दबडे, पोलीस हवालदार विश्वनाथ संकपाळ, राजकुमार ननवरे, संतोष पवार, पोलीस नाईक अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनिर मुल्ला, प्रविण पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.

Web Title: Crime against three in illegal sand transport case in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.