दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:21+5:302021-04-26T04:36:21+5:30
उंब्रज :पाल येथील हॉटेल स्वराज्य बिअर बार हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून सुरू ठेवल्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी ...
उंब्रज :पाल येथील हॉटेल स्वराज्य बिअर बार हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून सुरू ठेवल्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी तिघाजणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास केली.
तानाजी प्रल्हाद माने (वय ४५), विशाल हणमंत कापसे (२९, दोघे रा. पाल), दिलीप हणमंत मोरे (५९, रा. राहुडे, ता. पाटण) अशी पोलिसांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उंब्रज पोलीस गस्त घालत असताना पाल हद्दीत कमानीनजीक रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी दिसली. पोलिसांनी माहिती घेतली असता तेथील हॉटेल स्वराज्य बिअर बार सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी उंब्रज पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.