मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाºया तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:47 AM2021-06-09T04:47:59+5:302021-06-09T04:47:59+5:30

सचिन बापू शिंदे (रा. संगमनगर, सातारा), मच्छिंद्र भरत जाधव व धनाजी विठ्ठल जाधव (दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी ...

Crime against three persons for stealing mobile tower material | मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाºया तिघांवर गुन्हा

मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाºया तिघांवर गुन्हा

Next

सचिन बापू शिंदे (रा. संगमनगर, सातारा), मच्छिंद्र भरत जाधव व धनाजी विठ्ठल जाधव (दोघेही रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबवेतील तंत्रज्ञ अमित जाधव हे एका खासगी मोबाईल कंपनीत नोकरीस आहेत. संबंधित कंपनीचा कोळेवाडी येथे मोबाईल टॉवर आहे. सोमवारी संबंधित टॉवरमध्ये तांत्रीक बिघाड होऊन मोबाईलची सेवा बंद पडल्यामुळे अमित जाधव हे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी गेले. त्यावेळी सचिन शिंदे, मच्छिंद्र जाधव व धनाजी जाधव हे त्याठिकाणी अनधिकृतपणे काम करताना त्यांना दिसून आले. तसेच टॉवरमधील काही साहित्यही त्याठिकाणी नसल्याचे अमित यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्या तिघांना साहित्याबाबत विचारणा केली असता फिडर वायर तोडून ती शेजारच्या शेतात लपवून ठेवल्याचे तिघांनी सांगीतले. तसेच ४ टीआरएक्स कार्डबाबत विचारणा करता त्या तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अमित यांनी कंपनीचे सुपरवायझर शैलेंद्र चव्हाण, तंत्रज्ञ परिक्षित पाटील, उमेश गुरव या तिघांना त्याठिकाणी बोलाऊन घेतले. सर्वांनी सचिन शिंदे, मच्छिंद्र जाधव व धनाजी जाधव या तिघांकडे साहित्याबाबत विचारणा केली. मात्र, तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अमित जाधव यांनी याबाबतची फिर्याद कºहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. टॉवरमधील १२ हजार रुपये किमतीची वीस मिटर लांबीची फिडर वायर व १२ हजार रुपये किमतीचे टीआरएक्स कार्ड चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Crime against three persons for stealing mobile tower material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.