ऊस चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 13:29 IST2020-11-19T13:26:57+5:302020-11-19T13:29:16+5:30
crimenews, satara, police, sugercane जिहे विजयनगर (ता. सातारा) येथील ६० टन उसाची चोरी झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊस चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा
सातारा: जिहे विजयनगर (ता. सातारा) येथील ६० टन उसाची चोरी झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक श्रीरंग घोरपडे, दत्ता श्रीरंग घोरपडे, दत्ता रावसाहेब सरडे (रा. जिहे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून या तिघांविरोधात धर्मू खाशाबा सरडे (रा. अकले ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. धर्मू सरडे यांनी उसाची शेती दत्तात्रय कांबळे (रा. खेड) यांचा चार वर्षांच्या कराराने निम्म्या वाटेने दिले आहे.
कांबळे हे उसाचे देखभाल करीत होते. तसेच धर्मू सरडे हे अधूनमधून ऊस पाहण्यासाठी जात होते. दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी ऊस पाहण्यासाठी धर्मू सरडे गेले असता त्यांना ऊसतोड सुरू असल्याचेही निदर्शनास आले. हा ऊस वरील तीन संशयितांनी काढून नेला. चोरीस गेलेला ऊस १ लाख ७० हजार रुपये किमतीचा होता, असे पोलिसांनी सांगितले.