विनापरवाना वास्तव्यप्रकरणी दोन परदेशी पर्टकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 02:13 PM2021-03-05T14:13:43+5:302021-03-05T14:16:03+5:30
Panchgani Hillstation Police Satara- पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पाचगणी : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, इथोपिया देशाचे नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल हे त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील येथे वास्तव्यास राहिले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक संबंधितांनी व्हिसाची मुदतवाढ करून घेणे गरजेचे असतानाही त्यांनी तसे केले नाही.
वैध व्हीसा नसताना पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील डिसोझा एज्युकेशन ट्रस्ट ठिकाणी १५ ऑगस्ट २०२० पासून १५ जानेवारी २०२१ असे पाच महिने वास्तव्य केले. म्हणून संबंधित परदेशी नागरिकांवर परदेशी नागरिक कायदा १९४६ ते कलम १४ (अ) (ब) चे उल्लंघन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कॉन्सटेबल वैभव शामराव भिलारे यांनी दिली आहे. पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.