हिंदकेसरीसह तिघांवर कऱ्हाडात गुन्हा
By admin | Published: September 27, 2015 12:27 AM2015-09-27T00:27:41+5:302015-09-27T00:35:01+5:30
निवडणुकीवरून मारहाण केल्याचा आरोप
नवी मुंबई : वाशी खाडीपुलाखाली होणारे विसर्जन धोक्याचे ठरत आहे. शुक्रवारी रात्री विसर्जनासाठी आलेली एक व्यक्ती वाहुण गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलीसांनी बंदी केल्यानंतरही मुंबईतुन विसर्जनासाठी गणेशमुर्ती येत असल्याने अनंत चतुर्थीच्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मानखुर्द परिसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी वाशी खाडीपुलाखाली येत असल्याने अनंत चतुर्थीच्या दिवशी पोलीसांची डोकेदुखी वाढणार आहे. खाडीपुलाच्या मानखुर्द हद्दीच्या भागात परिसरातील गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र वाशीकडील खाडीच्या भागात पुरेशी सोय नसल्याने पोलीसांनी त्याठिकाणी विसर्जनावर बंदी आनलेली आहे. केवळ मच्छिमार बांधवांचा हा नेहमीचा मार्ग असल्याने त्यांच्याच घरगुती गणेशमुर्तींचे त्याठिकाणी होडीतुन विसर्जन होते. मात्र इतर व्यक्तींसाठी धोका असल्याने याठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही. तशा सुचनाही वाशी पोलीसांनी दिलेल्या आहेत. असे असतानाही मानखुर्द परिसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी त्याठिकाणी आनल्या जात आहेत.
पाचव्या दिवशीच्या विसर्जनावेळी सुमारे २०० गणेशमुर्तींचे त्याठिकानी विसर्जन झाले. वाशी पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करुनही अनेकजन खाडीमध्ये प्रवेश करत होते. शुक्रवारी रात्री देखिल मानखुर्दच्या काही गणेशमुर्ती वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी आल्या होत्या. यावेळी राजु रामभरोसे (४२) यांचा तोल जावून पाण्यात पडले. पोलीसांनी रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध घेवूनही त्यांचा तपास लागलेला नाही.
मानखुर्द येथे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई पोलीसांकडून त्याठिकाणी आलेल्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी वाशी हद्दीत पाठवल्यासद जात आहेत. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी देखिल वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेशमुर्तींचे आगमण होण्याची शक्यता आहे.
सदर ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने गाळात रुतुन अथवा पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती वाहुण जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई पोलीसांनी चेंबुर पोलीसांशी संपर्क साधून मानखुर्दच्या गणेशमुर्ती वाशीत पाठवू नये अश्या सुचनाही केलेल्या आहेत. (प्रतिनिधी)