दुचाकीस्वारास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:08+5:302021-07-02T04:27:08+5:30

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर आरळे गावच्या हद्दीत चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालक राजेंद्र ...

Crime on the driver for injuring a two-wheeler | दुचाकीस्वारास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

दुचाकीस्वारास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

Next

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर आरळे गावच्या हद्दीत चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालक राजेंद्र मारुती कदम (रा. आरळे, ता. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महेंद्र नारायण दयाळ (रा. शिवथर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दयाळ हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून (एमएच ११ सीझेड ८०४०) सातारहून लोणंदच्या दिशेने जात होते. या वेळी राजेंद्र कदम हा त्याच्याकडील कार (एमएच १४ - एई ५७१) भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या दिशेने चालवत होता. या वेळी त्याने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महेंद्र दयाळ यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हवालदार महांगडे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Crime on the driver for injuring a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.