यवतेश्वर परिसरात विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:37+5:302021-06-10T04:26:37+5:30
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून यवतेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस परिसरात विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात आपत्ती ...
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून यवतेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस परिसरात विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा तालुका पोलीस मंगळवारी (दि. ८) रात्रगस्त घालीत होते. रात्री बोगदा ते यवतेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर पॉवर हाऊस झोपडपट्टी येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अमोल देवाप्पा सूर्यवंशी (वय ३०, रा. जांबवाडी, सांगली), सागर एकनाथ साळुंखे (३१, रा. पेठभाग, जांबवाडी, सांगली), राहुल ईश्वर चव्हाण (३३), रा. जांबवाडी सांगली), विजय भगवान चव्हाण (३४, रा. पटेल चौक सांगली) हे कारमधून (एमएच १० सीएक्स- ९७९८) जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बोगदा ते यवतेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर पॉवर हाऊस झोपडपट्टी, सातारा येथे विनाकारण फिरत असताना आढळून आले. त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.