Crime news : क्षुल्लक कारणावरुन बापाचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:59 PM2022-01-10T20:59:28+5:302022-01-10T21:00:39+5:30

Crime news : फलटणमधील घटना: शुल्लक कारणावरून केला होता खून

Crime news : Life imprisonment for a child who kills his father for a trivial reason in satara court | Crime news : क्षुल्लक कारणावरुन बापाचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

Crime news : क्षुल्लक कारणावरुन बापाचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

Next

सातारा : साठेफाटा, ता. फलटण येथे वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुलगा शामसुंदर नारायण इंगळे (वय ४६, रा.साठेफाटा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नारायण भिकू इंगळे (वय ७०) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मुलगा शामसुंदर याने ३० मे २०१८ रोजी रात्री साडेनऊ वाजता वडील नारायण इंगळे यांच्यासोबत स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व कानावर फरशीचा वर्मी घावबसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत नारायण इंगळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीणचे फौजदार आर.आर.भोळ यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करत सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सुनावणीदरम्यान आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायाधिशांनीआरोपी शामसुंदर इंगळे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार उर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.  
 

Web Title: Crime news : Life imprisonment for a child who kills his father for a trivial reason in satara court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.