नळ चोरीप्रकरणी प्लंबरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:16+5:302021-07-15T04:27:16+5:30

सातारा : प्लंबिंगचे काम करण्यासाठी आलेल्या प्लंबरने एका घरातील काम संपल्यानंतर दुसऱ्या घरात जाऊन पाचशे रुपयांचा नळ चोरल्याचा ...

Crime on plumber in plumbing theft case | नळ चोरीप्रकरणी प्लंबरवर गुन्हा

नळ चोरीप्रकरणी प्लंबरवर गुन्हा

Next

सातारा : प्लंबिंगचे काम करण्यासाठी आलेल्या प्लंबरने एका घरातील काम संपल्यानंतर दुसऱ्या घरात जाऊन पाचशे रुपयांचा नळ चोरल्याचा प्रकार साताऱ्यातील रामराव पवार गोळीबार मैदानाजवळ उघडकीस आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात प्लंबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय शांताराम पाटोळे (वय ३९, रा. रविवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याला सीआरपीसीनुसार पोलिसांनी नोटीस बजावली आहे. याबाबत विशाल वसंत मोरे (वय ३४, रा. रामराव पवार नगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल माेरे यांच्या घराशेजारी असणारे अतुल सोनावणे यांच्या घरात प्लंबिंगचे काम करण्यासाठी पाटोळे हा आला होता. यावेळी तो अतुल सोनावणे यांच्या घराच्या टेरेसवरून मोरे यांच्या घराच्या टेरेसेवर आला. सेफ्टी डोअर बाहेरुन बंद करून पाण्याचा मेन काॅक बंद करून वाॅश बेसीनला असलेला पाचशे रुपयांचा स्टीलचा नळ त्याने चोरून नेला. हा प्रकार मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Crime on plumber in plumbing theft case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.