चुलत भाऊजी व कामगारावर चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:48+5:302021-07-28T04:40:48+5:30
सातारा : चुलत भाऊजी व घरातील कामगाराने एकत्र मिळून घरातील लोखंडी कपाटातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ...
सातारा : चुलत भाऊजी व घरातील कामगाराने एकत्र मिळून घरातील लोखंडी कपाटातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याप्रकरणी अंकुश गोरोबा हजारे (४८, रा. धुत्ता, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) व कामगार अक्षय महादेव पवार (रा. अपशिंगे, ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुदर्शन लहू कांबळे (३२, रा. वरद विनायक कॉलनी, करंजे, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दि. २७ जून रोजी सायंकाळी ४ ते ३० जून या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडलेला आहे. या चोरीच्या घटनेत सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची साखळी, कानातील झुबे, सोन्याच्या रिंगा व गणपतीचा मुखवटा आणि पेंडण असा एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
ही चोरी कांबळे यांचे चुलत भाऊजी अंकुश हजारे व त्यांचा कामगार अक्षय पवार यांनी केली असल्याचे कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हजारे व पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक झालेली नव्हती. या चोरीचा अधिक तपास पोलीस नाईक कुंभार करीत आहेत.