मंगल कार्यालय मालकासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:12+5:302021-02-23T04:59:12+5:30

सातारा : विवाह सोहळ्यासाठी पन्नास माणसे उपस्थित राहण्याची मर्यादा घालून दिलेली असतानाही दोनशे ते अडीचशे लोकांना एकत्रित करुन आपत्कालीन ...

Crime on three including the owner of the Mars office | मंगल कार्यालय मालकासह तिघांवर गुन्हा

मंगल कार्यालय मालकासह तिघांवर गुन्हा

Next

सातारा : विवाह सोहळ्यासाठी पन्नास माणसे उपस्थित राहण्याची मर्यादा घालून दिलेली असतानाही दोनशे ते अडीचशे लोकांना एकत्रित करुन आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघे लग्नमालक आणि मंगल कार्यालय मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहनदास इंदलकर, राजकुमार यादव आणि राजेंद्र साळुंखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, कोविड कालावधीत आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही सातारा शहर पोलिसांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने आपत्कालीन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, गोडोली येथील धनश्री मंगल कार्यालयात रविवार, दि. २१ रोजी झालेल्या विवाह सोहळ्यासाठी २० माणसांची परवानगी असताना प्रत्यक्षात तेथे २०० ते २५० माणसे उपस्थित असल्याचे सातारा शहर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी लग्नमालक मोहनदास सदाशिव इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा), राजकुमार तुकाराम यादव (रा. करंजे पेठ, सातारा) तसेच मंगल कार्यालय मालक राजेंद्र प्रभाकर साळुंखे (रा. गोडोली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहूल खाडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन नवघणे, चेतन ठेपणे यांनी केली. याप्रकरणी सचिन नवघणे यांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत.

Web Title: Crime on three including the owner of the Mars office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.