टोलनाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:32+5:302021-01-13T05:41:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुलीविरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी ...

From the crime of the Tolanaka movement | टोलनाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून

टोलनाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुलीविरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्यक सेवा-सुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्याविरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी दि १८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्यावेळी साताऱ्याकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते यांच्यासह ८० लोकांनी नाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून भुईंज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याची वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्यावतीने न्यायालयात ॲड. शिवराज धनवडे, ॲड. आर. डी. साळुंखे, ॲड. संग्राम मुंढेकर, ॲड. प्रसाद जोशी, तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड. मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.

Web Title: From the crime of the Tolanaka movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.