‘त्या’ अपघात प्रकरणी मृत तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:33+5:302021-08-13T04:45:33+5:30

सातारा : भरधाव कार चालवून मित्राच्या व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३, रा.कदमवाडी, ...

Crime on the young man who died in the accident | ‘त्या’ अपघात प्रकरणी मृत तरुणावर गुन्हा

‘त्या’ अपघात प्रकरणी मृत तरुणावर गुन्हा

Next

सातारा : भरधाव कार चालवून मित्राच्या व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३, रा.कदमवाडी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दि. १० रोजी मध्यरात्री जिल्हा न्यायालया शेजारील ओढ्यात तीस फूट कार कोसळून हा भीषण अपघात झाला होता. या अपघातातील जखमी युवक देवराज माळी (रा. जत, जिल्हा सांगली) याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघातात अदित्य घाटगे व अनिकेत कुलकर्णी या दोघांचा मृत्यू झाला होता. देवराजसह तिघेजण जेवण करुन जात असताना अनिकेत हा कार चालवत होता. हयगय, अविचार, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात कार चालवत असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. असे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Crime on the young man who died in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.