विनाकारण फिरणाऱ्या युवतीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:38+5:302021-04-21T04:38:38+5:30
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असतानाही त्याचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्या युवतीवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा ...
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असतानाही त्याचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्या युवतीवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुचिता पालकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवतीचे नाव आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, कोरोना महामारीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. शाहूपुरी पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना रविवार, १८ रोजी सुचिता जितेंद्र पालकर (वय २८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) ही युवती विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे तिच्यावर कारवाई करत तिला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली. याबाबतचा गुन्हा पोलीस कॉन्स्टेबल पंकज मोहिते यांनी दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार जाधव या करत आहेत.