वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २० भाजी विक्रेत्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:13 PM2020-02-18T14:13:48+5:302020-02-18T14:16:43+5:30
सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा : सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १५ ते २० भाजी विक्रेत्यांवर शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.
अनिल श्रीरंग जमदाडे (वय ५३, म्हसवे रोड, करंजे), आकाश विजय आवळे (वय २५, रा. रविवार पेठ, सातारा), राकेश जगन्नाथ नाईक (वय २०, रा. खेड, ता. सातारा), विशाल पवार, सुषमा राजेघोरपडे (रा. रविवार पेठ, सातारा) जैबुन पठाण (रा. करंजे), उज्ज्वला जगदाळे (रा. करंजे सातारा), छाया अडागळे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये या भाजी विक्रेत्यांसह आणखी १५ ते २० जण असल्याचे पोलिसांनी सांगितले. एसटी स्टॅन्ड ते राधिका सिग्नल जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर हे सर्वजण सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता भाजी विक्री करत होते.
या सर्वांना पोलिसांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर भाजी टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. साताऱ्यात पहिल्यांदाच भाजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.