कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे: फलटणमध्ये तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:36 PM2019-02-04T17:36:33+5:302019-02-04T17:40:37+5:30

फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकीपतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक व सदस्य अशा तेराजणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

Criminal offense against multi-crore rupees cheating: Complaint in Phaltan | कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे: फलटणमध्ये तक्रार

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे: फलटणमध्ये तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तेराजणांविरोधात गुन्हे : फलटणमध्ये तक्रारठेवी परत देण्यास चिंंतामणी पतसंस्थेकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप

फलटण : येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकीपतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक व सदस्य अशा तेराजणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकी, फलटण पतसंस्थेचे व्यवस्थापक संचालक व सदस्य नितीन शांतीलाल कोठारी, माधव कृष्णा आदलिंगे, प्रदिप बापूचंद गांधी, धनेश नवलचंद शहा, अजित रमनलाल दोशी, हर्षद मोहनलाल शहा, भुषन कांतीलाल दोशी, नाना खंडू लांडगे, जावेद पापाभाई मणेर, लाला तुकाराम मोहिते, सुरेखा विरचंद मेथा, स्नेहल नेमचंद मेहता, अजय अरविंद शहा (सर्व रा. फलटण) विरोधात फियार्दी राजेश मोहनलाल दोशी (वय ४०, रा. बुआसाहेब नगर, कोळकी) यांनी १ कोटी, ३३ लाख ६२ हजार २०१ रूपये रकमेच्या व दुसरे फिर्यादी भाग्यश्री कमलाकर भट, (२७, रा. सगुणामातानगर मलटण, ता. फलटण) यांची ९ लाख, ०९ हजार २०९ रूपये रकमेच्या ठेवी चिंतामणी पतसंस्थेत ठेवलेल्या होत्या.

त्या परत देण्यास वेळोवेळी टाळाटाळ करुन फसवणूककेल्याप्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापक संचालक व सदस्यासह तेराजणांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Criminal offense against multi-crore rupees cheating: Complaint in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.