गुन्हेगारीला चाप लावणार : शिवणकर

By admin | Published: June 12, 2015 11:36 PM2015-06-12T23:36:33+5:302015-06-13T00:14:39+5:30

पाटणचाही प्रभार

Criminalization will be done: Shivnakar | गुन्हेगारीला चाप लावणार : शिवणकर

गुन्हेगारीला चाप लावणार : शिवणकर

Next


कऱ्हाड : ‘कऱ्हाड हे संवेदनशील शहर आहे. त्याचबरोबर शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायाही गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे कऱ्हाड उपविभागात कायदा, सुव्यवस्था राबविताना सुरुवातीला या गुन्हेगारी वृत्तींना चाप लावणे आवश्यक आहे. यापुढे उपविभागातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शुक्रवारी उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तत्पूर्वी उपअधीक्षक शिवणकर यांनी पत्रकारांशी चर्चा केली.उपअधीक्षक शिवणकर म्हणाल्या, ‘जिल्ह्यात दहिवडी व सातारा उपविभागांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. सातारा आणि कऱ्हाडच्या तुलनेत दहिवडी उपविभागात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. त्याठिकाणी कायदा, सुव्यवस्था राबविताना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाहीत. सातारा उपविभागात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. तेथेही आम्ही समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गुन्हेगारी कृत्यांना आळा घातला होता. आता कऱ्हाडमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मुळात कऱ्हाड हे संवेदनशील आणि जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आजपर्यंतच्या घटनांवरून येथील गुन्हेगारी कारवाया गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी सुरुवातीला गुन्हेगारी कारवाया आणि गुन्हेगारी वृत्तींना चाप लावणे आवश्यक आहे. गुन्हेगारी वृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कऱ्हाडात कायदा, सुव्यवस्था राबविताना महिलांच्या प्रश्नांविषयी आपली आक्रमक भूमिका असेल. महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना असुरक्षित वाटणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य राहील. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीतही कडक पावले उचलली जातील. अवैध व्यवसायांवर पोलिसांचा वचक असेल. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कऱ्हाडात काम करताना हीच आमची भूमिका राहील.’ दरम्यान, उपअधीक्षक शिवणकर यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून उपविभागाचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)


पाटणचाही प्रभार
पाटणचे पोलीस उपअधीक्षक पद रिक्त आहे. गत अनेक महिन्यांपासून या उपविभागाचा कारभार कऱ्हाडचे उपअधीक्षक पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी राजलक्ष्मी शिवणकर येथे रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडेही पाटणचा प्रभार देण्यात आला असून, त्यांना कऱ्हाड व पाटण या दोन्ही उपविभागांत काम करावे लागणार आहे.

Web Title: Criminalization will be done: Shivnakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.