नागरिकांच्या मुळावर कचरा डेपोचे संकट : ढेबेवाडी रुग्णालय परिसरातील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:09 PM2018-09-02T22:09:21+5:302018-09-02T22:10:11+5:30
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशेजारीच कचरा डेपो निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह रुग्ण व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा
ढेबेवाडी : ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशेजारीच कचरा डेपो निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह रुग्ण व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
या ठिकाणी कचºयामुळे पसरत असलेल्या दुर्गंधीबाबत अनेकवेळा नागरिकांनी तक्रारी करूनही या कचरा डेपोकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी साथीच्या रोगाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.
विभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ढेबेवाडी बाजारपेठेशी दररोज स्थानिकांसह हजारो लोकांचा संपर्क येतो. बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालयात, ग्रामीण रुग्णालये यासह बाजारपेठ आणि आठवडी बाजारामुळे ढेबेवाडी येथे नागरिकांची व विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. येथे शाळांसह विविध शासकीय कार्यालये गावाच्या एका बाजूला आहेत. ग्रामीण आरोग्य रुग्णालय परिसरातच गावकºयांंनी कचरा डेपो बनविल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्राथमिक शाळेसह आरोग्य विभागाकडून स्वच्छता आणि आरोग्याबाबत नेहमीच प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जनजागृती केली जाते. मात्र, येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि रुग्णालय परिसरच कचरा डेपोने व्यापल्याने आरोग्याबाबत प्रबोधनाचा अधिकार त्यांना आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
लाखोंची उलाढाल मात्र, घनकचºयाकडे दुर्लक्ष
बाजारपेठेत दररोज लाखोंची उलाढाल होते. ग्रामपंचायतीलाही मोठा महसूल मिळतो. व्यापारी तसेच मिळकतदारांकडून वसुलीचे प्रमाणही चांगले आहे. तरीसुद्धा घनकचरा प्रकल्पाबाबत ग्रामपंचायत ठोस पावले उचलत नसल्याने व्यापाºयांसह ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.
घनकचरा प्रकल्पातून हे होतील फायदे....
सार्वजनिक ठिकाणी होणाºया कचºयाला बसेल पायबंद.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात पडेल भर.
साथीच्या रोगांचा होईल अटकाव.
सार्वजनिक ठिकाणी होणारी दुर्गंधी थांबेल.
सार्वजनिक जागांवर स्वच्छतेसाठी होणार अनावश्यक खर्च टळेल.
ढेबेवाडी ग्रामपंचायतीकडे स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध नाही. या प्रकल्पासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच यश येईल. लोकांचीही घनकचºयाची गंभीर समस्या आहे. आम्ही प्राधान्याने हा प्रश्न सोडवू. याबाबत ग्रामसभेतही चर्चा झाली आहे.
- विजयकुमार विगावे,
सरपंच, ग्रामपंचायत ढेबेवाडी.