वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:15 PM2017-12-11T13:15:25+5:302017-12-11T13:19:56+5:30
वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.
उंब्रज : वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच्या समोर येऊ शकते. या संकटामुळे वीज कंपनीला जाग येणार का? असा सवाल येथील शेतकरी करू लागले आहेत.
येथील उंब्रज-चोरे रस्त्यानजीक सोरजाई मळा आहे. येथील शेतीतून पाल फिडरची वीज वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीचा ताण काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तारा कमी उंचीवर आलेल्या आहेत.
या तारा एवढ्याखाली आलेल्या आहेत की, माणसांच्या उंचीपासून काही फूट अंतरावर त्या दिसत आहेत. शेतातील पिकांना घासत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या परिसरातील शेतकरी, त्यांच्या जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे.