संकट संपता संपेना, डेंगूचाही व्हायरस बदलतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:14+5:302021-09-26T04:42:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक ...

The crisis is not over, the dengue virus is also changing! | संकट संपता संपेना, डेंगूचाही व्हायरस बदलतोय!

संकट संपता संपेना, डेंगूचाही व्हायरस बदलतोय!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखा डेंग्यूही ही आपलं रूप आता बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या चिंतेत यामुळे भर पडली असून, हा डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचंदेखील म्हटले जात आहे.

डेंग्यू रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षण आढळून येत असल्याने डॉक्टर अक्षरशः हैराण झाले आहेत. कोरोनासारखा डेंगू वायरसदेखील बदलत आहे ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षण नाहीत, त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी वेळीच टेस्ट करून घेणे गरजेचे असल्याचे मत वैदिक अधिकारी व्यक्त करत आहेत. चालढकल केल्यास जीवावरही बेतण्यासारखा हा प्रकार असून डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोट :

जास्त रुग्णांमध्ये तापासोबतच डेंग्यूची लक्षणे पाहायला मिळत आहेत. पण त्यांच्या प्लेटलेट्स नॉर्मल आहेत. कदाचित चांगली प्रतिकारशक्ती असल्याने प्लेटलेट्समध्ये घट होत नसावी. पण हा संशोधनाचा विषय आहे.

एचडी. माने, पॅथॉलॉजिस्ट, सातारा

चौकट: हे बदल काळजी वाढवणारे...

ताप नसताना पॉझिटिव

अनेक जणांना ताप नसताना ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचे कारण वैद्यकीय अधिकारी सांगतायत कदाचित त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. वायरसने आपला बदल केला असला तरी एखाद्याच्या शरीरात त्याचा बदल म्हणजे त्याचा टिकाव लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे दुर्मिळातील दुर्मिळ रुग्णही डेंग्यूचे अलीकडे आढळून येत आहेत.

चौकट: प्लेटलेट्स कमी नाही तरी पॉझिटिव्ह

रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नाही. त्यामुळे हा डेंग्यूचा वेगळा स्ट्रेन चिंतेचा विषय बनला आहे. यावर डॉक्टरही ठोस सांगू शकत नाहीत. आपल्याला कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे केवळ डॉक्टर सांगतायत.

कोट : डेंग्यूचा नवा व्हायरस जरी बदलत असला तरी आपल्या सातारा जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मात्र रुग्णांनी आपल्या शरीरात झालेले बदल अवगत करून तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही वेळेला ताप किंवा अंगदुखी यासारखे प्रकारही होत नाहीत. पण आतून आपल्या शरीरातून बदल आपल्याला जाणवतात. त्यावेळी मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title: The crisis is not over, the dengue virus is also changing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.