महिलांच्या कुस्त्यांनी रंगले कातरखटावचे मैदान
By admin | Published: February 25, 2015 09:22 PM2015-02-25T21:22:21+5:302015-02-26T00:18:32+5:30
जंगी कुस्त्याचे मैदान : शंभर रुपये पासून एक लाखापर्यंतच्या निकाली कुस्त्या
कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे कात्रेश्वर यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचे मैदान पार पडले. महिलांच्या क ुस्त्या पाहण्यासाठी परिसरातून व बाहेरगावाहून पैलवानांनी व कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. या मैदानात शंभर रुपयांपासून एक लाखापर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. महिलांच्या कुस्त्या आहेत म्हटल्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून प्रेक्षकांची गर्दी दिसून येत होती. कुस्त्याची नोंदणी झाल्यानंतर ३ वाजता हालगी व शिंग फुंकून मैदानाला सुरुवात झाली.
या मैदानात राज्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा,अकलूज, इंदापूर, बारामती या ठिकाणाहून पैलवानांनी हजेरी लावली होती. पहिल्यांदाच कातरखटावमध्ये महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत कुस्त्या श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी होत होत्या; पंरतु या वर्षी पहिल्यांदाच यात्राकमेटी व ग्रामस्थांनी यात्राकाळात मैदान भरविण्याचे ठरविले. महिलांमध्ये प्राजक्ता देशमुख, सुप्रिया जाधव, प्रियांका दबडे, तेजस्विनी घाडगे या महिला पैलवानांनी पे्रक्षकांची वाहवा मिळविली. या कुस्त्या ग्रांमस्थाच्या चर्चेचा विषय ठरला. २१ हजार ते १ लाखापर्यंतच्या कुस्त्या बघण्याजोग्या झाल्या. यामध्ये पै. नितीन केचे, पै. संग्राम पोळ, पै. संग्राम पाटील, सोन्या सोनटक्के, पै. पांडुरंग मांडवे, पै. रवी शेंडगे, पै. शिवाजी तांबे, पै. सत्पाल सोनटक्के, पै.सद्दाम शेख यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. १ लाख इनामाची कुस्ती पै. नितीन केचे व संग्राम पोळ यांच्यात झाली. हे मैदान पाहण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै.आबा सूळ हे खास करून उपस्थित होते. या मैदानाला पंच म्हणून अर्जुन पाटील, श्रीमंत कोकरे, विकास जाधव, रमेश पवार, बबन बागल, भीमराव पाटोळे यांनी काम पाहिले. कुस्त्यासाठी तानाजीशेठ बागल, शिवाजीशेठ बागल, अॅड. दिलीप बोडके, संभाजी भिसे, शंकरशेठ बागल यांचे जंगी कुस्त्या भरविण्यासाठी अर्थसाह्य लाभले.
कुस्त्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ.आकाराम बोडके, शंकरशेठ बागल, नामदेव बागल, चेअरमन, पोपट बागल, मृगेंद्र शिंदे, अजित सिंहासने, यात्रा कमिटी व सर्व ग्रामंस्थांचे सहकार्य लाभले.
पुढील वर्षी यात्रेतील कुस्त्यांमध्ये जास्तीत जास्त पैलवानांनी कुस्त्यासाठी सहभागी व्हावे, असे यात्रा कमिटी तर्फे आवाहान करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कुस्त्यांच्या फडात महिला पे्रक्षक!
महिलांच्या एकूण पाच कुस्त्या झाल्या, या पाचही कुस्त्या निकाली झाल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून येत होती. हे या मैदानाचे या वर्षीचे खास वैशिष्ट्ये ठरले गेले. जस जसा दिवस सूर्यास्ताकडे जात होता तसतसा प्रेक्षकांचा उत्साह वाढत होता.