रुद्रेश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:22 PM2018-08-27T23:22:43+5:302018-08-27T23:22:47+5:30
मल्हारपेठ : ‘हर हर महादेव ... रुद्र्रेश्वराच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात हिरव्यागार निसर्गरम्य सह्याद्र्रीच्या कुशीत येराडवाडी, ता. पाटण येथील रुद्र्रेश्वराचा भंडारा सोमवारी पार पडला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.
मल्हारपेठपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या येराडवाडीनजीक सह्याद्र्रीच्या डोंगररांगात वसलेले पांडवकालीन स्वयंभू रुद्र्रेश्वर देवालय आहे. या देवालयात सोमवारी पहाटेपासूनच महाभिषेक, रुद्र्राभिषेक, होमहवन असे विविध धार्मिक कार्यकम सुरू होते. दुपारी बारा वाजता पांडुरंग महाराज-नाडोलीकर यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी व नंतर महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन पारायण सोहळ्याची सांगता झाली. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला भाविकांची संख्या जास्त होती. मंदिरासमोर पडणारा धबधबा भाविकांना आकर्षित करीत होता. दाट वनराई असल्याने अनेक सहकुटुंब आलेले भाविक रिमझिम पावसात कुटुंबासमवेत निसर्गाचा आनंद लुटत असल्याचे चित्र दिसत होते.
दिवसभर पाऊस असतानाही पाटण-कºहाड तालुक्यातील भाविक, विशेषत: महिला भविकांची संख्या मोठी होती. डोंगराच्या पायथ्यापर्यंत रस्त्याची सोय झाल्यामुळे अनेक भाविक पायथ्यापर्यंत वाहने घेऊन येत होते. पावसात चिंब भिजणारी तरुणाईचे दर्शन दिवसभर पायथ्याला असणाºया हिरवळीतील मैदानात दिसत होते. मंदिराशेजारी असणाºया भंडारागृहात भाविक महिला झिम्मा फुगडी खेळत होत्या. येराडवाडीतील रुद्र्रेश्वर देवस्थान ट्रस्ट, रुद्र्रेश्वर तरुण मंडळ व ग्रामस्थांनी महाप्रसाद वाटप, दर्शन रांगा, पिण्याचे पाणी यांचे नियोजन केले होते. आकर्षक हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या रांगातून भाविकांचा झरा वाहत असल्याचे रात्री उशिरापर्यंत दिसत होते.