Mahabaleshwar- जलधारा अन् चोहीकडे धुक्याची दुलई, महाराष्ट्राच्या 'चेरापुंजी'त पर्यटक लुटतायेत मनमुराद आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:00 PM2023-07-07T16:00:42+5:302023-07-07T16:17:24+5:30

जलविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा जलाशय देखील पावसामुळे भरण्याच्या मार्गावर

Crowd of tourists in Mahabaleshwar known as Cherrapunji of Maharashtra | Mahabaleshwar- जलधारा अन् चोहीकडे धुक्याची दुलई, महाराष्ट्राच्या 'चेरापुंजी'त पर्यटक लुटतायेत मनमुराद आनंद

Mahabaleshwar- जलधारा अन् चोहीकडे धुक्याची दुलई, महाराष्ट्राच्या 'चेरापुंजी'त पर्यटक लुटतायेत मनमुराद आनंद

googlenewsNext

अजित जाधव

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले या पर्यटन नगरीकडे वळू लागली आहेत.

महाबळेश्वरला निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पुरातन मंदिरे व ब्रिटिशकालीन पॉईंट पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसाळा सुरू झाल्यापासून तर येथील निसर्ग हिरवाईने भरून गेला आहे. धो-धो बरसणाऱ्या जलधारा अन् चोहीकडे पसरलेली धुक्याची दुलई स्वर्गीय अनुभव देत आहे. हाच आनंद लुटण्यासाठी काही हौशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देऊ लागले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी काही पॉईंट बंद करण्यात आले असले, तरी शहरातील मुख्य बाजारपेठ, वेण्णा जलाशय व क्षेत्र महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

महाबळेश्वरवासियांची तहान भागविणारा अन् जलविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा जलाशय देखील पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आला असून, जलाशयाचे विलोभनीय दृश्य नजरेत सामावून घेण्यासाठी पर्यटक हमखास या जलाशयाला भेट देत आहेत. परतीच्या प्रवासाला जाणारा प्रत्येक पर्यटक येथील सौंदर्य आपल्या कॅमेरात कैद करत आहे.

Web Title: Crowd of tourists in Mahabaleshwar known as Cherrapunji of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.