पाटण बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला निमंत्रण देतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:52+5:302021-02-20T05:48:52+5:30
जिल्ह्यात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे निर्बंध कमी होऊन हळूहळू बाजारपेठ, हॉटेल, पर्यटन आणि एसटी वाहतूक ...
जिल्ह्यात आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे निर्बंध कमी होऊन हळूहळू बाजारपेठ, हॉटेल, पर्यटन आणि एसटी वाहतूक सुरू झाली. यामुळे नागरिक कोरोना हद्दपार झाल्यासारखे बिनधास्त कोणतीही काळजी न घेता पाटण शहरात आणि बाजारपेठेत वावरताना दिसत आहेत.
शहराच्या जवळपासच्या गावांतूनही नागरिक बाजारासाठी गर्दी करत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच अचानक पाटण शहरात मुख्य बाजारपेठेत खूप गर्दी होत आहे. नागरिकांनी कोरोनाची काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वेळीच काळजी घेतली नाही तर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की वाढेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाटणचे नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले आहे.
फोटो :
पाटण येथील बाजारपेठेत होत असलेली गर्दी कोरोनाला आमंत्रण देऊ शकते.