सातारा जिल्ह्यात अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी आवश्यक परवाना नोंदणीसाठी व्यावसायिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:47 AM2017-12-04T11:47:52+5:302017-12-04T11:55:09+5:30
अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले. अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ व नियमने २०११ नुसार प्रत्येक फळ, भाजीपाला विक्रेते, चहा, नास्टा, भेळ, पान टपरी तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना नोंदणीकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
रहिमतपूर : अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक असलेला परवाना नोंदणीसाठी सातारा जिल्ह्यातील २२ ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये साताऱ्यात झालेल्या एका शिबीरात तब्बल ७५ जणांनी परवाने नोंद केले.
अन्न सुरक्षा व मानरे कायदा २००६ व नियमने २०११ नुसार प्रत्येक फळ, भाजीपाला विक्रेते, चहा, नास्टा, भेळ, पान टपरी तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना नोंदणीकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झालेल्या शिबीरात ७५ व्यावसायिकांनी परवाना घेतले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आर. सी. रुणवाल यांनी दिली.
याच प्रकारचे शिबीर सोमवारी कोरेगाव येथे होणार आहे. तर मंगळवारी महाबळेश्वर, बुधवारी पुसेसावळी, गुरुवारी कऱ्हाड बसस्थानक, शुक्रवार, दि. ८ रोजी शाहूपुरी, सोमवार, दि. ११ रोजी मेढा, मंगळवार, दि. १२ रोजी रहिमतपूर, बुधवारी, दि. १३ कऱ्हाडचा प्रीतिसंगम, गुरुवार, दि. १४ रोजी वडूज, शुक्रवार, दि. १५ रोजी फलटण, शनिवार, दि. १६ रोजी पाचगणी, सोमवार, दि. १८ रोजी कोळकी, मंगळवार, दि. १९ रोजी पाटण, बुधवार, दि. २० रोजी खंडाळा, गुरुवार, दि. २१ रोजी उंब्रज, शुक्रवार, दि. २२ रोजी नागठाणे, मंगळवार, दि. २६ रोजी म्हसवड, बुधवार, दि. २७ रोजी माहुली, गुरुवार, दि. २८ रोजी वाई, शुक्रवार, दि. २९ रोजी मसूर, शनिवार, दि. ३० रोजी ढेबेवाडी येथे हे शिबीर होणार आहे.
जानेवारीपासून कारवाई
विना परवाना खाद्यपदार्थांची विक्री करू. विना परवाना खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर जानेवारीपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळीच परवाना घ्यावा, असे आवाहन, आयुक्त आर. सी. रुणवाल यांनी केले आहे.