सातारा जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत गर्दी

By admin | Published: July 4, 2017 01:47 PM2017-07-04T13:47:39+5:302017-07-04T13:48:59+5:30

आषाढी एकादशी विविध उपक्रमांने साजरी

The crowd of Vitthal temples in Satara district | सातारा जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत गर्दी

सातारा जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत गर्दी

Next

आॅनलाईन लोकमत

सातारा , दि. 0४ : सातारा जिल्ह्यात आषाढी एकादशी विविध उपक्रमांने साजरी करण्यात आली. यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गावोगावच्या विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती.

आषाढीनिमित्ताने सातारा जिल्ह्यातून शेकडो विठ्ठल भक्त विविध दिंड्यांमधून पंढरपूरला गेले आहेत. त्यांना दिंड्यांतून जाणे शक्य नाही असे मंडळी एसटी किंवा खासगी वाहनांनी पंढरपूरला गेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील गावोगावच्या विठ्ठल मंदिरातही भक्तिभावाने आषाढी एकादस साजरी करण्यात आली.

साताऱ्यातील राजवाड्याच्या पाठीमागे असलेल्या गवई विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच गर्दी झाली होती. विठ्ठल-रुक्मिणी मुतीर्ची फुलांनी सजावट केली होती. तुळशीपत्र, फुले वाहिले जात होते. काही ठिकाणी भक्तांना शाबुदाना खिचडी दिली जात होती.

Web Title: The crowd of Vitthal temples in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.