पाटण ग्रामीण रुग्णालयात लसीसाठी तरुणांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:32+5:302021-07-03T04:24:32+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात कोरोनाची लस घेण्यासाठी शहरातील नागरिक पाटण ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत आहेत. यामध्ये ...
रामापूर : पाटण तालुक्यात कोरोनाची लस घेण्यासाठी शहरातील नागरिक पाटण ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत आहेत. यामध्ये तरुणांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. मात्र, लस मर्यादित येत असल्याने अनेकांना लस न घेता परत जावे लागत आहे. शहराच्या ठिकाणी लस जादा मागविण्यात यावी, अशी मागणीही तरुणांमधून होताना दिसत आहे.
पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढ नाही तो स्थिर आहे, तो प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पाटण नगरपंचायत आणि आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहे. त्याला शहरातील नागरिक प्रतिसाद देत आहेत. काही नागरिकांना दुसऱ्या डोसकरिता वारंवार ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे, तर आता पाटण तालुक्यात वय १८ च्या पुढील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाटण शहरातील तरुण पाटण ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, लस मर्यादित येत असल्याच्या कारणाने रांगेत उभे राहून काहींना लस मिळत नाही, त्यामुळे त्यांना परत जावे लागत आहे, तर वयोवृद्ध नागरिकांंना दुसऱ्या डोसकरिता देखील वारंवार यावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग आणि पाटण ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्यावतीने अधिक लसीची मागणी करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट..
आठ वाजता रांगेत.. प्रशासन मात्र अकरा वाजता!
पाटण ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिक आणि तरुण आठ वाजता उभे असतात. मात्र, आरोग्य कर्मचारी दहा वाजता येतात त्यांना लसीकरणसंदर्भात विचारले असता १०.३० वाजता समजेल की लस किती लोकांना दिली जाणार, त्यामुळे काहींना लस मर्यादित असल्याचे कारण सांगून परत पाठविले जाते. रुग्णालय प्रशासनाने जर सकाळी आठ वाजता नोटीस बोर्डवर कोणती लस आहे. त्याचा साठा किती आहे हे जर लिहिले तर नागरिकांना त्रास होणार आणि आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांच्यामधील कटू प्रसंग घडणार नाही.
०२पाटण
पाटण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.