संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

By Admin | Published: September 1, 2014 09:23 PM2014-09-01T21:23:45+5:302014-09-02T00:03:46+5:30

पाचवड : पुणे-बंगळूर महामार्गावरील समस्यांतून पोलीसही सुटले नाहीत

Crowded crisis protectors! | संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

संरक्षण करणाऱ्यांवरच कोसळले संकट!

Next

कवठे : गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या एस्कॉर्टसाठी निघालेल्या पोलीस जीपला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, पोलीस जीपचा चक्काचूर झाला आहे. महामार्गावरील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वाहनचालकांच्या जीवावर कशा प्रकारे उठल्या आहेत? याचेच जिवंत उदाहरण यानिमित्ताने सर्वांसमोर आले आहे.
रविवार, दि. ३१ आॅगस्ट रोजी मंत्र्यांच्या एस्कॉटसाठी असल्याने वाठार, ता. कोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी मधुकर सावळाराम जाधव (वय ५६) हे जीप (एमएच ११ ए बी २३८८) आणि वाई पोलीस स्टेशनचे बाळासाहेब धर्मू जाधव (वय ५३) , सोमनाथ बल्लाळ (वय ५३) व अरविंद गावित (वय ३५) या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी सात वाजता पाचवड, ता. वाई या ठिकाणी आली असता महामार्ग ओलांडत असता सातारा दिशेने रोडवर वाहने असल्याने ही पोलीस जीप रस्त्याच्या मध्यावर थांबली. त्याचवेळी सातारावरून पुण्याकडे निघालेला ट्रकने पोलीस जीपला पाठीमागून धडक दिल्याने जीप गोल-गोल फिरून पलटी झाली व चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. ट्रकचालक नागराज बसनप्पा कुंभार (वय २८, रा. रिटेहळी ताा हेरेगिरी जि. हवेरी कर्नाटक) याला भुर्इंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदने करीत आहेत.
दरम्यान, महामार्गाला जागोजागी अपुऱ्या सोयीसुविधा आहे. वास्तविक, ज्याठिकाणी जंक्शन आहे, तिथे महामार्गाला क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, महामार्गावर असे कुठेही दिसत नाही.
गेल्या दोन वर्षांपासून महामार्गावरील कामे पूर्णपणे बंद आहेत. कामे अर्धवट असल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आवश्यक त्याठिकाणी भुयारी मार्ग गरजेचे आहेत. पाचवडसारख्या जंक्शनमध्ये भुयारी मार्गांचा वापर होणे आवश्यक आहे.
महामार्ग प्राधिकरण याबाबत सक्ती करत नाही. वाहने महामार्गाच्या मधूनच रस्ते ओलांडत असतात. दोन मार्गांच्या मधल्या जागेत पुरेसी जागा नाही, एक बसही याठिकाणी बसू शकत नाही. बस आडवी उभी राहिली तर दोन महामार्गांवर ती येते. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोवर हे अपघात टाळता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांनी उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Crowded crisis protectors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.