प्रधानमंत्री योजनेतील निधीचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:17+5:302021-05-19T04:40:17+5:30

कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात १ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध घालण्यात ...

Crowds in front of banks to withdraw funds from Pradhan Mantri Yojana | प्रधानमंत्री योजनेतील निधीचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर गर्दी

प्रधानमंत्री योजनेतील निधीचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर गर्दी

Next

कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात १ जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचे नियम पायदळी तुडविताना दिसत आहेत. नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील ज्येष्ठ शेतकरी बँकांकडे लांबच लांब रांगा लावत आहेत.

यावेळी या रांगेमध्ये कुठेही सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत.

यावेळी अनावश्यक गर्दी टाळून गरज असेल तरच पैसे काढावे, असे आवाहन वडूथ येथील बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अनिल साळवे यांनी खातेदार शेतकऱ्यांना केली आहे.

Web Title: Crowds in front of banks to withdraw funds from Pradhan Mantri Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.