कास रस्त्यावर वाहनांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:45+5:302021-06-10T04:26:45+5:30
सातारा : जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच पर्यटन स्थळांकडे नागरिक वळले आहेत. सोमवारी सकाळपासूनच कास पठाराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर ...
सातारा : जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच पर्यटन स्थळांकडे नागरिक वळले आहेत. सोमवारी सकाळपासूनच कास पठाराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहने निघाली होती. रात्री उशिरापर्यंत वाहनांची ये-जा सुरू होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांसाठी जिल्ह्यामध्ये शिथिलता लागू केली आहे. सायंकाळी ५ नंतर पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याचा फायदा उठवून अनेक वाहनचालक दुचाकी तसेच चारचाकी घेऊन कास, ठोसेघर, बामणोली या परिसरात जाऊ लागले. विशेष म्हणजे सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असताना देखील यवतेश्वर घाटातून मोठ्या प्रमाणावर वाहने उतरताना पाहायला मिळत होती. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही नव्हता. लोकांना अशी जर सूट दिली तर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे.