कलाकाराच्या खुबीवर कळस ठरतो आकर्षक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:08+5:302021-03-07T04:35:08+5:30

कळस जेवढा आकर्षक, उठावदार, तेवढी मंदिराची शोभा वाढते, असे म्हणतात. पण, मंदिराचा कळस बांधताना कलाकाराला खूप कष्ट घ्यावे लागतात. ...

The culmination of the artist's talent is attractive ... | कलाकाराच्या खुबीवर कळस ठरतो आकर्षक...

कलाकाराच्या खुबीवर कळस ठरतो आकर्षक...

Next

कळस जेवढा आकर्षक, उठावदार, तेवढी मंदिराची शोभा वाढते, असे म्हणतात. पण, मंदिराचा कळस बांधताना कलाकाराला खूप कष्ट घ्यावे लागतात. उंचावरील कळस बांधताना तर जीव मुठीत असतो. तेव्हा कुठे कळस चढतो. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात कळस बांधण्याचे स्वरूप बदलले आहे. तरीही कलाकाराच्या खुबीवरच कळस आकर्षक ठरतो. त्यामुळे दुरूनही त्याचे दर्शन झाले तरी समाधान वाटते.

मंदिर जेवढे भव्यदिव्य, तेवढाच त्याचा कळस मोठा असतो. कळसावरून दुरूनही मंदिराची कल्पना करता येते. पूर्वीच्या काळी चुना, वाळू, बेलफळ, गूळ, झाडपाला आदींचे मिश्रण घाण्यात करून त्याचा वापर मंदिराच्या कळसासाठी करण्यात येत होता. त्यामुळे मंदिराचा कळस भरभक्कम होत असे. ऊन, वारा, पाऊस झेलूनही असे कळस आजही शेकडो वर्षांपासून मंदिराची शोभा वाढवताना दिसतात. महाराष्ट्रात तर अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. मात्र, अलीकडील ५० वर्षांच्या काळात कळस बांधण्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. सिमेंट, वाळूच्या मिश्रणातून कळसाच्या बांधकामाला सुरुवात होते. त्यानंतर प्लास्टर व नक्षीकाम झाल्यावर कळसाला चकाकी येण्यासाठी मार्बल पावडर व व्हाईट सिमेंटचा वापर करण्यात येतो. मात्र, सध्या सिमेंट व वाळूतून बांधण्यात येणारे कळस ५० ते ७० वर्षेच टिकू शकतात.

कळसाचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये हेमाडपंथी, साधे कळस, चौकोनी, अष्टकोनी, बाराकोनी, मकेच्या कणसासारखा सोट, कमानी असे अनेक प्रकार कळसाचे आहेत. मंदिराचे खालून बांधकाम पूर्ण झाले की, कळस बांधण्याचे काम हाती घेतले जाते. मंदिराचा पाया जितका भक्कम, तेवढा कळस उंच बांधता येतो. अगदी पाच फुटांपासून १०० पेक्षाही अधिक फुटावर कळस तयार केला जातो. त्याप्रमाणात त्याचा खर्चही वाढतो. मंदिरापेक्षा कळस अधिक चांगला, आकर्षक व डोळ्यात भरणारा असावा, असाच प्रयत्न लोकांचा असतो. त्यामुळे मंदिराचे कळस हे आकर्षक दिसून येतात.

चौकट :

कळसालाही मोजमाप असते...

मंदिराचा कळस बांधण्यासाठीही मोजमाप असते. कोणत्या प्रकारात कळस बांधायचा आहे, यावर त्याचे मोजमाप व खर्चही ठरतो. मोजमाप केल्याशिवाय मंदिराचा कळस उभाच राहत नाही. त्याचबरोबर कलाकारालाही काम करता येत नाही, हेही आणखी एक सत्य आहे.

- नितीन काळेल

.......................................................

Web Title: The culmination of the artist's talent is attractive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.