सांस्कृतिक वाईचा कृष्णाकाठ ढोल-ताशांनी दणाणला!

By admin | Published: December 3, 2015 09:56 PM2015-12-03T21:56:02+5:302015-12-03T23:49:19+5:30

‘लोकमत इनिशिएटिव्ह’चे यश : डॉल्बीला फाटा दिल्याने ज्येष्ठांचाही वाढला सहभाग

Cultural witch Krishna drum-drums with cards! | सांस्कृतिक वाईचा कृष्णाकाठ ढोल-ताशांनी दणाणला!

सांस्कृतिक वाईचा कृष्णाकाठ ढोल-ताशांनी दणाणला!

Next

वाई : पद्मश्री शाहीर साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठा सेवा संस्थेने महागणपती घाटावर ढोल-ताशाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेला गणेशोत्सव मंडळांनी तसेच ढोल-ताशा मंडळांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला़ स्पर्धेमध्ये वैयक्तिक गट व सांघिक गटात प्रेक्षकांना वेगवेगळी कसब पाहावयास मिळाल्याने वाईकर रसिक मत्रमुंग्ध झाले़ आणि महागणपती घाटावर एक वेगळे चैतन्याचा महापूर आला़ यावेळी तीन हजारांच्या वर वाईकर नागरिक घाटावर उपस्थित होते़
डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम समोर आल्याने प्रशासनाने कंबर कसली़ राज्य शासनानेही डॉल्बीवर अटी-शर्ती लावून बंदी घातली. गेली वर्षभर ‘लोकमत’ने ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉल्बीच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती केली़ याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी, गावांनी स्वत:हून डॉल्बी न वाजविण्याचा निर्णय घेतला़ अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांची कास धरली, अनेक मंडळे ढोल-ताशाकडे वळाली. गणेशोत्सवात चौकाचौकांतून ढोल-ताशा वाजू लागले़
या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संस्थेने पहिल्यांदा एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आणि याला वाईकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला़ स्पर्धेमध्ये सहभागी मंडळात मुलींचा सहभाग ही लक्षणीय होता़ शाहीर साबळे यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे उ्घाटन ‘इंटेक’च्या अध्यक्षा वनिता जाधव यांच्या हस्ते झाले़ परीक्षक म्हणून गणेश इंगवले व सनी करंबे यांनी काम पाहिले़ यावेळी बी. जी. शिर्के कंपनीचे सीईओ जगन्नाथ जाधव, नगरसेवक अनिल सावंत, भारत खामकर, मदन पोरे, काशिनाथ शेलार, डॉ़ नितीन कदम, संजय चौधरी, हेंमत येवले, अ‍ॅड़ प्रतापराव शिंदे, अ‍ॅड. जगदीश पाटणे, प्रदीप जायगुडे, अमित गुडगे-पाटील, राजेश पाडळे, हृषीकेश बाबर, बाजीराव मोरे, सुनील शिंदे, जयदीप शिंदे, आबा चोरगे, नाना खोपडे, सजंय शेटे, विजय ढेकाणे, धंनजंय शिंदे, इंटेकच्या प्रतिभा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती़ स्पर्धेमध्ये वैयक्तिक सादरीकरणात प्रथम क्रंमाक नितीन शिंदे -शिवप्रतिज्ञा ढोल पथक रविवारपेठ, वाई, द्वितीय दुर्गेश सोनावणे - सिंहगर्जना ढोल पथक, ब्राह्मणशाही वाई़
सामूहिक स्पर्धेत प्रथम क्रमांक धर्मपुरी युवा ढोल-ताशा मंडळ, यांना ११,००० व ट्रॉफी, द्वितीय क्षत्रीय कुलावंतस ढोल पथक ब्राह्मणशाही, वाई यांना ७,००० व ट्रॉफी, तृतीय क्रमांक आझाद झांज पथक, सोनगिरवाडी वाई यांना ५,००० व ट्रॉफी, व उत्तेजनार्थ सिंहगर्जना ब्राह्मणशाही वाई व स्वाभिमानी मराठा ढोल-ताशा पथक नावेचीवाडी वाई यांनी पटकाविला़
विजेत्या स्पर्धकांना शाहीर साबळे यांच्या पत्नी माई साबळे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी, रोख रकमेचा चेक व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली़ लक्ष्मीकांत रांजणे यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)


चोखळल्या
ढोल-ताशाच्या वाटा
डॉल्बीमुळे ध्वनिप्रदूषण होते़ शहरात शाळा व हॉस्पिटलच्या परिसरात रुग्ण व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वाहत जाते़ सामान्य नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो, यामुळे डॉल्बीविषयी असलेल्या लोकभावनेचा व आलेल्या बंदीचा विचार करून अनेक मंडळांनी सकारात्मक पाऊल उचलून डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांची कास धरली आहे़

Web Title: Cultural witch Krishna drum-drums with cards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.