काळुबाईच्या यात्रा काळात जमावबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:04+5:302021-01-16T04:43:04+5:30

वाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने मांढरगडावरील काळुबाई देवीची यात्रा व सुरूरची दावजी बुवा यात्रा आयोजित ...

Curfew imposed during Kalubai's Yatra | काळुबाईच्या यात्रा काळात जमावबंदी लागू

काळुबाईच्या यात्रा काळात जमावबंदी लागू

Next

वाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने मांढरगडावरील काळुबाई देवीची यात्रा व सुरूरची दावजी बुवा यात्रा आयोजित करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या यात्रा कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार मांढरगडावरील काळुबाई देवी यात्रा व दावजी बुवा यात्रा सुरूर यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होईल असे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टच्या सदस्यांनीच पार पाडावेत. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल.

यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी असेल. यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशु व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत वाई तालुक्यातील मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून दहा किलोमीटर परिसर, परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर जमादाडे वस्तीशेजारी वाई, वाई शहर व सुरूर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Curfew imposed during Kalubai's Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.