ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:45+5:302021-01-17T04:33:45+5:30
विधानसभेची चाचणी म्हणून सर्व राजकीय पक्ष आपल्या गावपातळीवरील कार्यर्कर्त्यांची मोट बांधून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून ...
विधानसभेची चाचणी म्हणून सर्व राजकीय पक्ष आपल्या गावपातळीवरील कार्यर्कर्त्यांची मोट बांधून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून आले. काही ठिकाणी राज्यात झालेल्या महाविकास आघाडीची संकल्पना पूर्णत्वास येऊन गावपातळीवरील राजकारण खेळले गेले असल्याचे दिसून आले. विभागात गोळेश्वर ग्रामपंचायतीच्या तेरा जागांसाठी तीस उमेदवारांच्यात चुरशीने मतदान झाले, तर दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. याठिकाणी सत्ताधारी पॅनल विरोधात महाविकास आघाडीसह तीन पॅनलमध्ये लढत झाली. एकूण ४ हजार २६५ मतदानांपैकी ३ हजार ५८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८४% मतदान झाले.
कार्वे येथे सत्ताधारी धर्मराज एल. वाय. पाटील पॅनल विरोधात धानाईदेवी यशवंत ग्रामविकास पॅनलने महाविकास आघाडीच्या माध्यमातून कडवे आव्हान उभे केले. याठिकाणी सतरा जागांसाठी तीन अपक्षांसह ३७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. याठिकाणी ६ हजार ६२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ८४ टक्के मतदान पार पडले. कोडोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सहा जागा बिनविरोध झाल्या, तर पाच जागांसाठी चुरशीने मतदान झाले. एकूण १ हजार ५७७ मतदानांपैकी १ हजार ४५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी ८५ टक्के मतदान झाले.
- चौकट
शेरेत १५ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात
शेरे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पॅनलविरोधात पारंपरिक विरोधी भीमाशंकर पॅनलने आव्हान निर्माण केले. तसेच याठिकाणी माऊली प्रतिष्ठाननेही तिसरे पॅनल उभारुन तिरंगी लढतीद्वारे चुरस निर्माण केली. १५ जागांसाठी होणाऱ्या लढतीत दोन अपक्षांसह ४७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, तर शेणोलीत १५ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते.