ग्राहकांची पाठ; टपऱ्या कुलपात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:10+5:302021-03-10T04:38:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारी मुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंचायत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारी मुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पंचायत समिती जवळ च्या रस्त्यावर टपऱ्या मध्ये फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना कपड्यांना कुलूप लावून बसावे लागले आहे.
सातारा शहरात जागोजागी गाडे उभे करून पळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने पंचायत समिती आणि बांधकाम विभाग यांच्या मधल्या रस्त्यावर असणाऱ्या फुटपाथवर बसण्याची सक्ती केली आहे. मात्र या ठिकाणी विक्री कमी होत असल्याने विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
आता गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी मुळे केले केले त्या लोकांमध्ये अनेकांना घरी बसावे लागले. गाठीशी देव जेवढा पैसा होता तो देखील खर्च झाल्याने अनेकांच्या कडे भांडवल उरलेलं नाही. भांडवल नसल्याने फळ विक्रीची दुकाने पुन्हा सुरू करता येत नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवलेली आहेत.
दरम्यान ज्यांची दुकाने सुरू आहेत त्यांच्याकडे ग्राहक फिरकत नाहीत त्यामुळे फळ विक्री होत नाही ही फळे कालांतराने खराब होत असल्याने फळविक्रेते यांच्यावर तेलही गेले आणि तूपही असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. सातारा शहरात रस्त्यावर कुठेही फळ विक्री करायची म्हटली तरी पालिका तसेच वाहतूक शाखा कारवाई करत असल्याने हे विक्रेते दिलेल्या जागेत ग्राहकांची वाट बघत बसलेले पाहायला मिळतात.
टपऱ्या जरी बंद असल्या तरी पालिकेला पैसे द्यावेच लागतात परफेक्ट परीचे दिवसाकाठी तीस रुपये भाडे पाली का वसूल करते यातून सुटका नाही. कोरोना महामारी संपत नाही तोपर्यंत व्यवसायावर पाणी पुरवावे लागणार आहे.
- लक्ष्मण निकम, फळ विक्रेता
फोटो ओळ सातारा येथील पंचायत समिती जवळचा रस्त्यावर असलेल्या फुटपाथवर या टपर्या ग्राहक विना बंद ठेवण्यात येत आहेत. (छाया : सागर गुजर)
(हॅलो एक साठी विषय)